मेलबर्न : ट्रॅविस हेडची (११४) शतकी तर स्टीव्ह स्मिथ(८५), मार्नस लाबूशेन (६३) आणि टीम पेन (७९) यांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरूध्दच्या मालिकेतील ‘बाॅक्सिंग डे’ कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावामध्ये सर्वबाद ४६७ धावा केल्या.
Australia are all out for 467!
Travis Head top-scored for his side with 114 while Marnus Labuschagne, Steve Smith and Tim Paine made fifties.
Neil Wagner shines with the ball, returning 4/83.#AUSvNZ SCORECARD: https://t.co/Svt1gr1205 pic.twitter.com/tVfc4cGNoJ
— ICC (@ICC) December 27, 2019
आॅस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर ४ बाद २६७ धावांपर्यत मजल मारली होती. त्यात शुक्रवारी दुस-या दिवशी आॅस्ट्रेलियाला २१० धावांची भर घालता आली. कालच्या ४ बाद २६७ वरून पुढे खेळताना शुक्रवारी आॅस्ट्रेलियाची सुरूवात चांगली झाली नाही. स्मिथला त्याच्या कालच्या धावसंख्येत फक्त ८ धावांची भर घालता आली. नील वैगनरने निकोल्सकरवी त्याला ८५ धावांवर झेलबाद केलं. त्यानंतर टिम पेन आणि हेडने संघाची धुरा संभाळत सहाव्या विकेटसाठी १५० धावा जोडल्या. टिम पेन ७९ धावांवर बाद झाला.
Neil Wagner gets his third!
A huge LBW appeal was followed by a successful review by New Zealand as Tim Paine departs for 79.#AUSvNZ pic.twitter.com/5ij1rfHhyd
— ICC (@ICC) December 27, 2019
त्यानंतर आॅस्ट्रेलियाचा एकही फलंदाज मैदानावर तग धरू शकला नाही आणि ३३ धावांत शेवटचे ४ फलंदाज माघारी परतले. यामध्ये मिचेल स्टार्क १ , पॅट कमिन्स ० , नाथन लायन १ धावांवर बाद झाले. ट्रॅव्हिस हेडने २३४ चेंडूत १२ चौकारासह ११४ धावांची खेळी केली तर जेम्स पॅटिसनने नाबाद १४ धावा केल्या.
A brilliant innings from Travis Head comes to an end as Neil Wagner sends him back for 114.
Batted, Head 👏#AUSvNZ pic.twitter.com/sQb2qpQMg0
— ICC (@ICC) December 27, 2019
न्यूझीलंडकडून नील वैगनरने ८३ धावांत ४, टिम साउदीने १०३ धावांत ३ , काॅलिन डी ग्रैंडहोमने ६८ धावांत २ तर ट्रेंट बोल्टने ९१ धावांत १ गडी बाद केला.