मुंबई – मराठी चित्रपटासाठी यंदाचे वर्ष मिश्र होते. २०१९ या सरत्या वर्षात काही मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बाजी मारली तर काही चित्रपट दणकून आपटले. मात्र त्यातील हातावर मोजण्या इतकेच चित्रपट आज मराठी प्रेक्षकांच्या लक्षात राहिले आहेत.
आनंदीबाई यांच्या जीवनाचा आढावा घेणारा ‘आनंदी गोपाळ’ हा मराठी चित्रपट १५ फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रदर्शित झाला. ललित प्रभाकर, भाग्यश्री मिलिंद, अंकिता गोस्वामी, गीतांजली कुलकर्णी अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपट दिसून आली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ‘ठाकरे’ हा चित्रपट २५ जानेवारी २०१९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री अमृता राव मुख्य भूमिकेत दिसून आले होते.
लोकप्रिय मराठी लेखक ‘पु. ल. देशपांडे’ यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘भाई’ (व्यक्ती की वल्ली) हा चित्रपट ४ जानेवारी २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात घडलेली हिरकणीची वीर कथा ‘हिरकणी’ या चित्रपटात दर्शवली आहे. २४ ऑक्टोबर २०१९ मध्ये हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवता आला.
‘फत्तेशिकस्त’ हा चित्रपट शिवाजी महाराजांची युद्धनीती आणि त्यांचा गनिमी कावा यावर आधारित आहे. चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, हरीश दुधाडे, अजय पूरकर, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, दिग्पाल लांजेकर, विक्रम गायकवाड, प्रसाद लिमये, अनुप सोनी, समीर धर्माधिकारी, निखिल राऊत, तृप्ती तोरडमल, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना, रुची सावर्ण, नक्षत्रा मेढेकर.