#AUSvNZ : न्यूझीलंड विरूध्दच्या ‘दिवस-रात्र’ कसोटीसाठी आॅस्ट्रेलिया संघ जाहीर

पर्थ : आॅस्ट्रेलियाने गुरूवारपासून पर्थ येथे न्यूझीलंडविरूघ्द सुरू होणा-या दिवस-रात्र कसोटीसाठी आपल्या अंतिम ११ सदस्यीय संघात कोणताही बदल केलेला नाही. आॅस्ट्रेलिया तिन्ही कसोटीत याच अंतिम ११ खेळाडू सोबत मैदानात उतरणार आहे.

प्रशिक्षक जस्टीन लँगर हे स्थिर अंतिम ११ खेळाडूचा संघ करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि त्यामुळेच नुकत्याच झालेल्या दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर त्यांना संघात बदल करण्याचं कोणतचं कारण दिसत नाही. पण आॅस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन याने म्हटलं आहे की, मेलबर्न आणि सिडनी कसोटीत मात्र परिस्थितीनुसार संघात बदल केला जाऊ शकतो.

न्यूझीलंड आॅस्ट्रेलियात १२ ते १६ डिसेंबर पहिली, २६ ते ३० डिसेंबर दुसरी आणि ३ ते ७ जानेवारी दरम्यान तिसरी कसोटी खेळणार आहे.

आॅस्ट्रेलियाचा ११ जणांचा संघ : टिम पेन (कर्णधार), डेविड वार्नर, जो बर्न्स, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मैथ्यू वेड, ट्रेविस हेड, पैट कमिंस, मिशेल स्टार्क, नाथन लियोन आणि जोश हेझलवुड.

Leave A Reply

Your email address will not be published.