मेलबर्न : मार्नस लबुशेन आणि स्टीव स्मिथच्या नाबाद अर्धशतकीच्या खेळावर यजमान आॅस्ट्रेलियाने मालिकेतील दुस-या कसोटी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडविरूध्द पहिल्या डावात पहिल्या दिवसअखेर ९० षटकात ४ बाद २५७ धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ट्रैविस हेड २५, तर स्टीव स्मिथ ७७ धावांवर खेळत होता.
End of day one of the Boxing Day Test at the Melbourne Cricket Ground 🏏
Australia finish on 257/4, with Steve Smith unbeaten on 77. Colin de Grandhomme was the pick of the bowlers with two wickets. #AUSvNZ SCORECARD ▶️ https://t.co/Svt1gr1205 pic.twitter.com/0Z0iLf6GLh
— ICC (@ICC) December 26, 2019
मेलबर्न क्रिकेट मैदानावर गुरूवारपासून या लढतीला प्रारंभ झाला. न्यझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना आॅस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं. मात्र आॅस्ट्रेलियाची सुरूवात चांगली झाली नाही. पहिल्या षटकात चौथ्या चेंडूवर ट्रेंट बोल्टने जो बर्न्सला त्रिफळाचित केले. जो बर्न्स शून्यावर बाद झाला. त्यानंतर वाॅर्नर आणि लबुशेन यांनी दुस-या विकेटसाठी ६० धावांची तर लबूशेन आणि स्टिव स्मिथने तिस-या विकेटसाठी ८३ धावा जोडल्या. नील वैगनरने टिम साउदीकरवी वाॅर्नरला ४१ धावांवर झेलबाद तर काॅलिन डी ग्रैंडहोमने मार्नस लबुशेनला ६३ धावांवर त्रिफळाचित केले.
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या मैथ्यू वेदने ३८ धावांची खेळी करत स्मिथसोबत चौथ्या विकेटसाठी ७२ धावा जोडत संघाची धावसंख्या २०० पार नेली. मैथ्यूला काॅलिन डी ग्रैंडहोमने बीजे वाॅटलिंगकरवी झेलबाद केले. त्यानंतर स्मिथ आणि ट्रैविस हेड यांनी डाव संभाळत दिवसअखेर आणखी पडझड होऊ दिली नाही आणि संघाची धावसंख्या २५७ पर्यंत नेली.
संक्षिप्त धावफलक : आॅस्ट्रेलिया : पहिला डाव : ९० षटकात ४ बाद २५७( डेविड वाॅर्नर ४१, जो बर्न्स ०, मार्नस लबूशेन ६३, मैथ्यू वेद ३८, स्टीव स्मिथ ७७* आणि ट्रैविस हेड २५* वर खेळत आहे. गोलंदाजी : ट्रेंट बोल्ट ६०-१, काॅलिन डी ग्रैंडहोम ४८-२.)