मेलबर्न – रवीचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर अपयशी ठरल्याचे मान्य करताना ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टिव्ह स्मिथने त्याचे कौतुकही केले आहे.
अश्विनने मला दोन्ही कसोटीत संभ्रमात टाकले होते. मला त्याच्यावर दडपण राखता आले नाही तर त्यानेच माझ्यावर दडपण ठेवले, असेही स्मिथने सांगितले. या मालिकेत अश्विनने स्मिथला दडपणाखाली ठेवले आहे.
दोन सामन्यातील चार डावात दोनवेळा अश्विननेच त्याला बाद केले आहे. दोन्ही कसोटीत मिळून स्मिथने केवळ 10 धावा केल्या आहेत.