#CWC19 : विजयाची आम्हाला संधी – मोर्तझा

नॉटिंगहॅम : माजी जगज्जेत्या वेस्ट इंडिजला पराभवाचा धक्का देणाऱ्या बांगलादेशचे पुढचे ध्येय आहे ते ऑस्ट्रेलियावर मात करण्याचे. त्यामुळेच येथे आज होणाऱ्या लढतीबाबत कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे. या सामन्याआधी बांगलादेशचा कर्णधार मशरफे मोर्तझा याने विजयाची आम्हालासुध्दा संधा आहे असे म्हटले आहे.

तो म्हणाला की, “भारताने ऑस्ट्रेलियावर नुकताच विजय मिळविला आहे. आम्ही विडींजला पराभवाचा धक्का दिला आहे. त्यामुळे या स्पर्धेत कोणताही संघ अनपेक्षित कामगिरी करू शकतो. हे लक्षात घेतले तर आम्हालाही आज विजयाची संधी आहे”.

चारशे धावांचे लक्ष्य गाठण्याची क्षमता आमच्याकडे आहे. शकीब व दास यांनी कमालीची कामगिरी केली आहे. आजही त्यांच्यावर मदार आहे असे बांगलादेशचा कर्णधार मशरफे मोर्तझा याने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.