अकरावी प्रवेश : यंदा 1 लाख जागा?

पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात यंदासाठी अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत एक लाखापर्यंत जागा उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे.

कनिष्ठ महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी अर्जाचा भाग-2 भरण्यास सुरूवात झाली असून पहिल्याच दिवशी 12 हजार 107 विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे. गेल्या वर्षी प्रवेशासाठी 286 महाविद्यालयांनी नोंदणी केली होती. यात 96 हजार 300 प्रवेशाच्या जागा होत्या. यासाठी 92 हजार अर्ज आले होते. त्यातील 79 हजार प्रवेश निश्‍चित झाले. उर्वरित जागा रिक्तच राहिल्या. यंदा 298 महाविद्यालयांची नोंदणी झाली आहे. शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी प्रवेशाच्या 10 टक्के जागा वाढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, या जागांचा लाभ हा नामांकित महाविद्यालयांनाच होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.