मेलबर्न – ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पीन गोलंदाज शेन वॉर्न याच्या पार्थिवावर सेंट कील्डा फुटबॉल क्लबच्या मैदानावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी वॉर्नचे कुटुंबीय तसेच मोजक्या मित्रांच्या उपस्थितीत वॉर्नला अखेरचा निरोप देण्यात आला.
4 मार्चला थायलंडमधील एका व्हिलामध्ये शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. अंतिम संस्कार मेलबर्नच्या मैदानावर लाखो चाहत्यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, तसे घडले नाही व अत्यंत खासगी स्तरावर तसेच शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.
यावेळी वॉर्नची तीन मुले ब्रुक, जॅक्सन व समर यांच्यासह वॉर्नचे आई-वडील उपस्थितीत होते. तसेच ऑस्ट्रेलियाच्या संघाचा माजी कर्णधार मार्क टेलर, ऍलन बोर्डर, इंग्लंडचा माजी कसोटीपटू मायकल वॉन याच्यासह जवळपास शंभर व्यक्ती वॉर्नला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. गेल्या आठवड्यात वॉर्नचे पार्थिव थायलंडहून मेलबर्नला आणले गेले होते.