औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 19 ऑगस्टला निवडणूक

नवी दिल्ली – महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 19 ऑगस्ट 2019 रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. ही माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिध्दी पत्रक काढून दिली आहे. औरंगाबाद-जालना या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे आमदार सुभाष झांबड यांची मुदत 29 ऑगस्ट 2019ला संपत आहे. यामुळे रिक्त होणाऱ्या जागेसाठी आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणुकीची अधिसूचना 25 जुलै 2019 रोजी जारी होईल.

निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 1 ऑगस्ट 2019 असून अर्जांची छानणी दुसऱ्या दिवशी 2 ऑगस्टला होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 5 ऑगस्ट 2019 आहे. निवडणुकीसाठी मतदान 19 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 8.00 ते दुपारी 4.00 या वेळेत होईल. मतमोजणी 22 ऑगस्ट 2019 रोजी होईल.औरंगाबाद-जालना या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आजपासून तत्काळप्रभावाने निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)