पॅरिस – सापेक्षतावादाचा सिद्धांतासह अनेक सिद्धांत मांडून वैज्ञानिक क्षेत्रात क्रांती करणारे शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या एका सिद्धांताच्या हस्तलिखिताचा लिलाव करण्यात आला असून लिलावाच्या प्रक्रियेत या हस्तलिखिताला तब्बल 97 कोटी रुपये किंमत मिळाली आहे.
ख्रिस्तीज या जगविख्यात लिलाव कंपनीने या हस्तलिखिताचा लिलाव केला आहे त्यांनी दिलवल्या माहिती प्रमाणे जून 1913 ते जानेवारी 1914 या कालावधीमध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन आणि त्यांचा सहकारी बेसो यांनी सिद्धांताचे लिखाण केले होते नंतर जो सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडण्यात आला त्याची तयारी म्हणून हा सिद्धांत होता या सिद्धांतातुनच पुढे सापेक्षतावादाचा सिद्धांत विकसित झाल्याचे मानण्यात येते 54 पानांच्या या हस्त लिखतात आइन्स्टाइन यांनी आपल्या स्वतःच्या अक्षरांमध्ये हा सिद्धांत लिहिला आहे.
या 54 पानांमध्ये आईन्स्टाईनच्या अक्षरांमध्ये अनेक समीकरणे आणि गणितीय आकडेमोड आली आहेत त्या काळामध्ये आईन्स्टाईन कशा प्रकारे विचार करत होता हे त्यावरून येते या वक प्राथमिक सिद्धांताच्या आधारे 1915 मध्ये आईन्स्टाईन यांनी सापेक्षतावादाचा क्रांतिकारी सिद्धांत मांडला त्यांच्या कामाविषयी जगात सर्वांनाच कुतूहल असल्यामुळे त्याच्या अक्षरातील कागदपत्रांना नेहमीच लिलावामध्ये चांगली किंमत मिळते. 2002 मध्ये अशाच एका हस्तलिखितासाठी सहा लाख डॉलर्स किंमत आली होती.