मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतने भारताच्या स्वातंत्र्याबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि त्यावरून झालेला वाद सुरूच आहे ती नेहमीच सोशलवर बेधडक बोलत असते. ती कधी राजकीय नेत्यांशी पंगा घेतांना दिसते तर कधी बॉलीवूडवर जहरी टीका करतांना दिसते.
यातच अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने तिच्या बाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. सध्या सिद्दीकी कंगना निर्मिती करत असलेल्या ‘टिकू वेड्स शेरु’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
या चित्रपटाबाबत तसेच कंगना बाबत सिद्दीकी यांना पत्रकरांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले,’मी सध्या कंगना निर्मित करत असलेल्या टिकू वेड्स शेरु या चित्रपटात काम करत आहे. ती एक प्रेम कहाणी आहे. ते पुढे म्हणाले,’कंगना ही एक उत्कृष्ट निर्माती असून ती निर्मित करत असलेल्या चित्रपटाची कथा मला आवडली. पण माझा तिच्या वैयक्तिक आयुष्याशी आणि तिच्या विचारांशी काहीही संबंध नाही,”
दरम्यान, कंगना निर्मिती करत असलेल्या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर हे कलाकार स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘मणिकर्णिका फिल्म्स’द्वारे केली जात आहे.