Dainik Prabhat
Monday, July 4, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home मुख्य बातम्या

अबाऊट टर्न: आकर्षण

by प्रभात वृत्तसेवा
August 12, 2019 | 8:00 am
A A

हिमांशू

श्रीमंतीचं आकर्षण नसलेला माणूस शोधून सापडायचा नाही. कालच्यापेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या आपली सांपत्तिक स्थिती चांगली असलीच पाहिजे, या वेडानं आपल्याला झपाटलेलं असतं. या मानसिकतेला काही अंशी सामाजिक परिस्थितीही जबाबदार असते. भरपूर पैसा राखून असलेल्या माणसानं तो कसा कमावला, हे आपल्या दृष्टीनं आता तितकंसं महत्त्वाचं राहिलेलं नाही. पैसा आहे आणि येतोय एवढंच महत्त्वाचं मानलं जातं. आपल्या या मानसिकतेची लिटमस टेस्ट घ्यायची झाली, तर टीव्हीवर आपल्याला काय पाहायला आवडतं, हा प्रश्‍न आपण स्वतःला विचारू शकतो.

टीव्हीवरच्या मालिकांमध्ये आलिशान घरं, श्रीमंतीचं झगमगाटी प्रदर्शन, झकपक कपडे घातलेली माणसं, त्यांच्या मालकीच्या कंपन्या हे सगळं आपल्याला दिसतं. आलिशान घरात नातेसंबंध मोडकळीला आलेले असतात आणि भव्य कंपन्यांमध्ये अधिकारीपदासाठी साठमारी चाललेली दिसते. काळ्या, पांढऱ्या, करड्या रंगात रंगवलेल्या व्यक्‍ती वेगळीच मूल्यव्यवस्था आपल्याला बेमालूम देत असतात. टीव्हीवर आपल्या घरासारखं घर दिसलं, तर आपल्याला ते फारसे रूचत नाही. व्यवहारातसुद्धा आपल्याला पैसेवाल्या मित्रासोबत राहायला आवडते; परंतु त्याने तो पैसा गैरमार्गानं मिळवल्याचं जेव्हा सिद्ध होते आणि तो अडचणीत येतो, तेव्हा एकेक मित्र त्याच्यापासून दुरावत जातो. जोवरी पैसा, तोवरी बैसा… दुसरं काय!

हेच पाहा ना, सोन्याचे नाव घेतल्यावर आपल्या डोळ्यांपुढे ग्रॅम आणि तोळा यापेक्षा मोठी परिमाणं येत नाही; परंतु एखाद्याच्या घरात किलोच्या हिशेबात सोने सापडले, तर त्या बातमीकडे आपण डोळे विस्फारून पाहतो. आय मॉनेटरी ऍडव्हायजरी म्हणजे आयएमए पॉन्झी घोटाळ्यातला मुख्य आरोपी मन्सूर खान दुबईहून दिल्लीत आला आणि त्याला अटक झाली. बंगळुरूतल्या त्याच्या घरावर छापा पडला, तेव्हा तीनशे तीन किलो म्हणजेच तब्बल तीन क्विंटलपेक्षा जास्त सोनं सापडलं. या महाशयांनी ते कुठे लपवून ठेवलं असेल, याची आपण कल्पनाही करू शकत नाही.

पठ्ठ्यानं स्वीमिंग पुलच्या तळाखाली हे सोने लपवून ठेवल्याचे आढळले. या मन्सूर खानवर तीस हजार लोकांना फसवल्याचा आरोप आहे; परंतु बातमी पाहताना आपल्याला ही तीस हजार माणसे दिसत नाहीत. दिसतं ते फक्‍त सोनं. खरं तर ज्यांची फसवणूक झाली, ती आपल्यासारखीच माणसं असतात. ती आपल्याला दिसली नाहीत, तर उद्या आपणही अशाच कुठल्यातरी फसवणुकीला बळी पडणार, हे गृहीत धरून चालावं. कारण अशा पॉन्झी योजना जाहीर करणारे आपल्याला झटपट श्रीमंतीचं आमिष दाखवतात. फसवणारा दोषी आहेच; परंतु फसणाराही तेवढाच दोषी ठरतो. फसवणूक करणारा आपले पैसे घेऊन फरार झाला, की मगच आपले डोळे उघडतात. तोपर्यंत फक्‍त झगमगाट आपल्याला दिसत असतो.

श्रीमंती पाहण्याची सवय एकदा जडली, की सुख आणि समाधान यातला फरक धूसर होतो. घराच्या बाबतीत आपण वन-बीएचके किंवा टू-बीएचकेची स्वप्नं रंगवत असतो. पण निक जोन्स आणि प्रियांका चोपडा यांनी त्यांचं पाच बेडरूमचं घर लहान पडतं म्हणून 6.9 दशलक्ष डॉलरला कसं विकलं आणि दोन कोटी डॉलर बजेट ठेवून आणखी मोठं घर ते कसं शोधतायत, याची बातमी आपल्या आकर्षणाचं केंद्र ठरते. नेमका इथंच घोटाळा होतो.

Tags: editorial page article

शिफारस केलेल्या बातम्या

अग्रलेख : पिक्‍चर अभी बाकी हैं
अग्रलेख

अग्रलेख : पिक्‍चर अभी बाकी हैं

14 hours ago
लक्षवेधी : अणुयुद्धाची छाया
संपादकीय

लक्षवेधी : अणुयुद्धाची छाया

14 hours ago
47 वर्षांपूर्वी प्रभात : मिझो “ब्रिगेडियर’ शरण आला
संपादकीय

47 वर्षांपूर्वी प्रभात : आवश्‍यक वस्तूंचे भाव 20 ते 40 टक्‍क्‍यांनी खाली आले

15 hours ago
अबाऊट टर्न : घड्याळ
संपादकीय

अबाऊट टर्न : घड्याळ

15 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

#INDvENG 5th Test : अन्… ‘कोहली-बेअरस्टो’ मैदानातच भिडले; पंचांनी हस्तक्षेप करत मिटवला वाद

विरोधीपक्षनेतेपदी अजित पवारांच्या निवडीवर जयंत पाटील म्हणतात “त्यांचा स्वभाव रोखठोक आणि स्पष्ट असल्याने..”

#विशेषअधिवेशन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहात केल्या 3 मोठ्या घोषणा

#SLvIND 2nd WODI : स्मृती-शेफालीची तुफानी खेळी; भारतीय महिला संघाचा श्रीलंकेवर मोठा विजय

विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी अजित पवार यांची निवड

OBC Reservation : …भाजपच्याच लोकांनी आरक्षणात आडकाठी आणली – छगन भुजबळ

फडणवीसांकडून स्पष्टीकरण, “आमच्याकडे आलेले लोक ED मुळेच आलेत हे खरं, पण…”

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची मविआ सरकारवरील टीका खोटी आणि दिशाभूल करणारी – अजित पवार

गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी सुविधा !

भू-जल पातळी खालावली, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याचा धोका

Most Popular Today

Tags: editorial page article

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!