चिंचवडमध्ये खासगी बसला आग

पिंपरी (प्रतिनिधी) : बसला लागलेल्या आगीत जळून खाक झाली. ही घटना रविवारी रात्री चिंचवड येथे घडली. पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास चिंचवड स्टेशन ते चिंचवडगाव या रस्त्यावर लोकमान्य हॉस्पिटलजवळ एमएच-48-के-0657 या बसला आग लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक मुख्यालय आणि प्राधिकरण उपकेंद्रातून प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाला.

अग्निशामक दलाने अवघ्या वीस मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. आगीचे कारण समजू शकले नाही. ही बस मुंबई येथील अर्जुन ट्रॅव्हल्सची आहे. या बस रस्त्याच्या कडेला उभी होती त्यामध्ये कोणीही प्रवासी नसल्याने कोणीही जखमी झाले नाही. अग्निशामक दलाचे लिडींग फायरमॅन सुभाष लांडे, फायरमन दिनेश इंगळकर, दिलीप गायकवाड, कैलास वाघेरे, विकास तोरडमल, विठ्ठल सकपाळ, सरोज पुंडे, मुकेश बर्वे, मयूर कुंभार, यांच्या पथकाने आग विझविण्याची ही कामगिरी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.