न्हावरे – येथील बॅंक ऑफ इंडियाची एटीएम सेवा अनेकवेळा बंद असते. त्यामुळे नागरिकांना अनियमित एटीएम सेवेमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. बहुसंख्य नागरिक सुरक्षितेमुळे रोख रक्कम सोबत बाळगण्याऐवजी एटीएम कार्डचा वापर करत आहेत आणि ते वापरणे ही सुरक्षित आहे; मात्र महिन्यात जास्तीत-जास्त वेळा गावातील कोरेकर कॉम्प्लेक्स येथील बॅंक ऑफ इंडियाची एटीएम सेवा बंद असते.
त्याचप्रमाणे घोडगंगा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील एटीएममध्ये कॅश उपलब्ध नसल्यामुळे पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये येणाऱ्या ग्राहकांचा अनेकदा भ्रमनिराश होत आहे. त्यामुळे बॅंक ऑफ इंडियाने कोरेकर कॉम्प्लेक्स व घोडगंगा सहकारी साखर कारखाना येथील एटीएम सेवा नियमित सुरू ठेवावी, अशी मागणी संतप्त ग्राहकांनी केली आहे.
येथील दोनही एटीएम बंद असल्यामुळे येथील परिसरातील नागरिक पैसे काढण्यासाठी बॅंकांमध्ये गर्दी करत आहेत. त्यामुळे येथील बॅंकांमध्ये सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला आहे.