हडपसर – भारतरत्न, माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी पुणे शहर भारतीय जनता पार्टी आयोजित ‘अटलशक्ती महासंपर्क अभियानाला’ आज सुरुवात झाली. हडपसर विधानसभा मतदारसंघात अतिशय उत्साहात हे अभियान राबविण्यात आले. सुमारे साडेबावीस हजार नागरिकांशी थेट संपर्क या अभियानाच्या माध्यमातून साधण्यात आला.अशी माहिती भाजपा हडपसर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष संदिप दळवी यांनी दिली.
हडपसर विधानसभा मतदार संघातील ९० शक्ति प्रमुख, ४५४ बूथ प्रमुख आणि ३९०० बूथ सदस्यांनी कोंढवा, महंमदवाडी, सय्यदनगर, ससाणेनगर,काळेपडळ, हडपसर गाव,मगरपट्टा , मांजरी बुद्रुक, साडेसतरानळी, केशवनगर परिसरातील नागरिकांशी संवाद साधून केंद्र सरकारच्या लोकोपयोगी योजना, महापालिकेने राबविलेल्या महत्वाच्या प्रकल्पाची माहिती नागरिकांशी सवांद साधून दिली.
दरम्यान आज सकाळी मांजरी बुद्रुक येथे अमित घुले यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे भारतरत्न, माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संदिप दळवी, गणेश घुले, अमित घुले, तुषार घुले, आकाश प्रभुणे, निलेश घुले, मयूर मिरगणे, करण प्रभुणे, प्रकाश ठोंबे, गणेश चौधरी आदीजण उपस्थित होते.