मुंबई-जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले वयाच्या 80 व्या वर्षी अनेक दिवसानंतर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रवीण बिरजे दिग्दर्शित देव देव्हाऱ्यात नाही असं या आगामी चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक मुद्द्यावर भाष्य करण्यात येणार आहे.या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्षीक करण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे 7 ते 8 महिन्यांच्या प्रदिर्घ कालावधीनंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा हा पहिला चित्रपट ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. नितीन उपाध्याय यांच्या ऑडबॉल मोशन पिक्चरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.
विक्रम गोखले यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक बहूआयामी सिनेमे केले. आता ते 80वर्षचे असून या वयातही ते अभिनयासाठी प्रचंड मेहनत घेत असल्याचं समजतं आहे. या चित्रपटात त्यांची मुख्य आणि महत्वाची भूमिका आहे.
हा चित्रपट मला अतिशय जवळचा आहे. या चित्रपटाच्या पहिल्याच वाचनाच्या वेळी मी या चित्रपटाला होकार दिला. हा चित्रपट एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर आधारित आहे जो सगळ्यांना अतिशय आपलासा आणि ओळखीचा आहे. त्यामुळे हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा अशी अपेक्षा आहे, असं विक्रम गोखले म्हणाले.