मुंबई – ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचा थरकाप उडवणारा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात केरळमध्ये धर्मांतर करून दहशतवादाच्या आगीत फेकल्या गेलेल्या मुलींची कहाणी मार्मिक पद्धतीने मांडण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये शालिनी उन्नीकृष्णनचा केरळच्या हिंदू कुटुंबातून फातिमा बनण्यापर्यंतचा खतरनाक प्रवास दाखवण्यात आला आहे.
ट्रेलरची सुरुवात एका कौटुंबिक दृश्याने होते जिथे एक आई तिच्या मुलीला हाताने खायला भरवताना दिसते. कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. मात्र हे फार काळ टिकत नाही. कुटुंबातील शालिनीसोबत नेमकं काय घडत आणि ती धर्मांतर करण्यासाठी कशी प्रवृत्त होते या बाबी ट्रेलरमधून उलगडण्यात आल्या आहेत. ट्रेलर पाहताना घडणाऱ्या विदारद गोष्टी पाहून अंगावर अक्षरशः काटा येतो.
विशेष म्हणजे ही केवळ शालिनीची कथा नाही तर केरळ राज्यातील हजारो मुलींची कहाणी आहे.ट्रेलरमध्ये शालिनीला विचारले आहे. ‘तू आयसिसमध्ये कधी सामील झालीस?’ त्यावर ती म्हणते ‘आयसीसमध्ये कधी सामील झाली हे जाणून घेण्यापेक्षा कशी सामील झाले हे जाणून घेणं जास्त महत्त्वाचं आहे.यानंतर मुलींचं ब्रेनवॉश कस केलं जात त्यांना जाळ्यात अडकवण्यासाठी काय काय करतात हे सर्व दाखवण्यात आले आहे.
मुलींचे धर्मांतर त्याभोवती फिरणारे राजकरण तसेच त्यात अडकलेल्या मुलीची व्यथा तसेच तिच्या कुटुंबाला सहन करावा लागणार त्रास हे सर्व केरला स्टोरीमधून उलगडणार आहे. केरला स्टोरीमधून लापता झालेल्या 32 हजार महिलांबाबतची कहाणी सर्वांसमोर येणार आहे.हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले आहे. विपुल अमृतलाल शाह यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटात अदा शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.