- 158 रुग्णांची भर
- चौघांचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस घटत असले तरी गेल्या 24 तासांत पुन्हा 158 नव्या रुग्णांची भर पडल्याने बाधितांचा आकडा 89 हजार 946 इतका झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 4 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
मंगळवारी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (बुधवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 158 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर गेल्या 24 तासांत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण शहरातील रहिवासी होते. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 1573 वर पोहोचला असून, शहराबाहेरील 651 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूच्या आकड्याने 2224 ची संख्या आज गाठली.
गेल्या 24 तासांत मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील यमुनानगर, काळेवाडी, भोसरी आणि चऱ्होली येथील चौघांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरातील 86 हजार 773 जण करोनामुक्त झाले असून, शहराबाहेरील 6938 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 95 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गेल्या दोन दिवसांतील 1188 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज नव्याने संशयित असलेले 1520 जण महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत.