…आता राज ठाकरेंची ईडी ला नोटीस

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालय (ईडी ) ने नोटीस पाठवून कोहिनुर मिल प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते. परंतु आता राज यांनीच ईडी ला फलक मराठीत लावण्यासाठीही नोटीस पाठवली आहे.

“महाराष्ट्रात शासकीय फलक हे मराठीत असायला हवेत, त्यामुळे त्याबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्या नोटीसची प्रत ईडीला पाठवली”, असं मनसेने म्हटलं. शिवाय मराठी भाषा विभाग ईडीला मराठी फलकाची सक्ती करणार का?  असा सवालही मनसेने विचारला. या संदर्भात मनसेकडून ट्विटरद्वारे माहिती देण्यात आली आहे.

आता सद्य परिस्थितीत ईडी कसर्यालयाचा फलक हा हिंदी आणि इंग्रजिमध्ये असून त्यावर प्रवर्तन निदेशालय असं लिहलेलं आहे. तर त्याखाली Enforcement Directorate असं इंग्रजीत लिहिलं आहे. मनसेच्या या नोटीसीनंतर फलकावर “अंमलबजावणी संचालनालय” असं नाव दिसणार का हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)