स्वा.सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना; सोबोध भावे म्हणाले…

मुंबई – दिल्ली विद्यापीठाच्या आवारात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली आहे. काँग्रेसप्रणित ‘नॅशनल स्टूडंट्स युनियन ऑफ इंडिया’च्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना केली. या घटनेनंतर सर्वच स्तरारून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मराठी अभिनेता सुबोध भावेने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेचा निषेध नोंदविला आहे.

“स्वा.सावरकरांचे विचार पटायला हवेत किंवा नाही हा ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विषय आहे,पण म्हणून त्यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालणं आणि त्याची विटंबना करणं हे निंदनीय आहे. स्वातंत्र्य लढ्यातील सर्वांबद्दल नितांत आदर माझ्या मनात आहे आणि या घटनेचा मी निषेध करतो”. असं सोबोध भावे म्हणाला आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह यांच्या पुतळ्यासोबत सावरकरांचा पुतळा बसवला जाऊ शकत नाही, असा आक्षेप ‘एनएसयूआय’ने घेतला. त्यानंतर गुरुवारी (22 ऑगस्ट) ‘नॅशनल स्टूडंट्स युनियन ऑफ इंडिया’च्या कार्यकर्त्यांनी सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करत, ‘भगतसिंह अमर रहें’ आणि ‘बोस अमर रहें’ अशी घोषणाबाजीही केली.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×