खडकवासला – वेल्हे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक मनोज पवार यांना १ मे रोजी पोलीस महासंचालक पदक देऊन गौरवण्यात आले. पोलिस महासंचालकाचे पदक मिळाल्याने पोलीस दलासह वेल्हे, हवेली, मुळशी, भोर तालुक्यातील नागरिकांनी त्यांचे आभिनंदन केले.
सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी जनसंवाद साधण्यावर भर देत सहकाऱ्यांना विश्वासात घेतले. त्यांना संपूर्ण पाठबळ दिल्याने स्वाभावीकपणे त्यांच्यामध्ये काम करण्याची उर्मी आली. गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल पवार आणि त्यांच्या सहका-यांनी केली. गुटखा तस्करीपासून ते विविध प्रकारच्या चोर्या, घरफोड्या, खुन, अशा आणि यासारख्या अनेक गुन्ह्यांच्या मुळापर्यंत जात आरोपींना गजाआड करण्यामध्ये वेल्हे पोलीसांनी विशेष कामगिरी बजावली आहे. सदैव तत्पर टीम आणि खबर्यांचे मोठे नेटवर्क या बळावर अनेक गुन्ह्यांचा उलगडा त्यांनी केला आहे.