वेल्हे तालुक्यात नव्या 6 रूग्णांची भर
वेल्हे (प्रतिनिधी) – वेल्हे तालुक्यात करोना आटोक्यात येईनासा झाला आहे. तालुक्यात करोनाच्या रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत नाही. एकदंरीत रूग्णांचा वाढता आलेख पाहाता करोनाच्या विषाणूने तालुक्यात हात-पाय पसरलेले दिसत आहेत.
तालुक्यातील वेल्हे 3, निगडे मोसे 1, कुरण बुद्रक 1, वांजळेवाडी 1 अशा एकूण सहा जणांना नव्याने बाधा झाली असून 42 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती वेल्हे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी माहिती दिली.
वेल्हे तालुक्यात नव्या रूग्णांची सातत्याने वाढ होत आहे. रोजच्या रूग्णांच्या आकड्यात कमी जास्त वाढ होत आहे; परंतु ही वाढ थांबायला नाव घेत नसल्याचे चित्र आहे. आता नव्याने सहा रुग्णांची भर पडल्यामुळे तालुक्यातील लागण झालेल्यांचा आकडा 78 झाला असून 33 रूग्ण बरे झाले आहेत. दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 43 जण उपचार घेत आहेत.