नवी दिल्ली – आयकर विभागाने, दिल्ली, हरियाना, पंजाब, गोवा आणि अन्य ठिकाणच्या हवाला ऑपरेटरांवर छापे घातले. त्यात त्यांना 5 कोटी 26 लाख रूपयांची रोकड व दागदागिने आढळून आले आहेत.
काल सोमवारी एकूण 42 ठिकाणांवर हे छापे घालण्यात आले होते. खोटी बिले सादर करून काही जण संघटीतपणे हवाला स्वरूपाचे एन्ट्री ऑपरेशन चालवत होते अशी माहिती मिळाल्यावरून ही कारवाई करण्यात आली.
यावेळी 2 कोटी 37 लाख रूपयांची रोकड व 2 कोटी 89 लाख रूपयांचे दागदागिने जप्त करण्यात आले आहेत. या संबंधीत व्यक्तींची 17 बॅंक लॉकर्स अजून उघडायची आहेत. त्यातहीं बराच माल सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या छाप्यातून सुमारे पाचशे कोटी रूपांच्या हवाला स्वरूपाच्या व्यवहारांची माहितीही अधिकाऱ्यांना उपलब्ध झाली असून त्या अनुषंगानेहीं आता कारवाई केली जात आहे.