शिक्रापूर – वरुडे (ता. शिरूर) परिसरातील शिंगाडवाडी येथे शेतातील बांधावरील दगड पाडल्याच्या कारणावरून सख्खा भावाने व पुतण्याने शेतकऱ्याला मारहाण केली. याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंगाडवाडी येथील शेतकरी शांताराम शिंगाडे हे त्यांच्या जमीन गट नं. 88च्या शेतात असताना त्यांच्या शेतातील बांधावर शांताराम यांचा भाऊ दिलीप शिंगाडे व पुतण्या सागर शिंगाडे हे तेथे आले व त्यांनी शांताराम यांना तू आमच्या बांधावरचा दगड का पाडला, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यावेळी शांताराम यांचा पुतण्या सागर याने शांताराम यांच्या पाठीत व पोटावर खोऱ्याने मारहाण करून जखमी केले. याबाबत शांताराम ठकाजी शिंगाडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी दिलीप ठकाजी शिंगाडे व सागर दिलीप शिंगाडे (दोघे रा. शिंगाडवाडी, वरुडे ता. शिरूर) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.