वाशिम – मंदिरातील दानपेटीतील पैसे लुटून पुजाऱ्याच्या डोक्यात राॅड मारून हत्या केल्याची घटना वाशिमच्या केकतउमरा परिसरातील दुर्गा मंदिरात घडली. मारोती पुंड (वय 52) असे हत्या झालेल्या पुजाऱ्याचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मंदिर गावापासून दूर रस्त्यालगत असल्याने हत्या कोणी केली याचा सुगावा लागला नाही. पोलिसांनी अज्ञातांवर हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. वाशिम ग्रामीण पोलिसांचे पथक आणि गुन्हे शाखेचे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.