मुंबई – गुजरातमधील 40 वर्षीय उद्योगतपीची हत्या केल्याप्रकरणी दहिसर पोलिसांनी एका तरुणाला जेरबंद केले आहे. औषधांचा व्यवसाय करणारे व्यापारी मनीष पटेल हे एका महिन्यांपूर्वी व्यवसायानिमित्त मुंबईत आले होते. यावेळी ते त्यांच्या अपार्टमेंटमध्ये गळा चिरलेल्या स्थितीत बेशुद्धावस्थेत आढळले होते.
या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची छाननी केली असता मनीष पटेल यांना शनिवारी दोन व्यक्ती भेटायला आल्याचे समजले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण गजानन पाटील म्हणाले की, “आम्हाला समजले आहे की पटेल आणि अटक केलेल्या एका आरोपीसह अन्य दोघे घरात पार्टी करत होते.”
पटेल भाड्याने घर शोधत असताना दोन संशयितांच्या संपर्कात आला. दोन्ही आरोपी पटेल यांच्याकडे वारंवार येत असल्याचीही माहिती समोर आली आहे. राहुल रामनाथ शर्मा (20) असे दोन संशयितांपैकी एकाचे नाव असून तो मजूर आहे.
त्याला मंगळवारी अटक करण्यात आली. हा खून रागाच्या भरात झाल्याचा अंदाज आहे. मात्र आम्ही हत्येचा नेमका हेतू शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही पोलिसांनी सांगितले.