हांगझोऊ :- बर्थडे बॉय सरबज्योत सिंग आणि दिव्या टीएस यांनी नेमबाजीमध्ये भारताची अभूतपूर्व कामगिरी सुरू ठेवत, शनिवारी येथे आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावले.
या भारतीय जोडीला जागतिक विजेते निशानेबाज झांग बोवेन आणि देशबांधव जियांग रॅनक्सिन यांनी पराभूत करून सुवर्णपदकावर नाव कोरले. त्यांनी टॉप पोडियम फिनिशसाठी शूट-ऑफमध्ये 16-14 असा विजय मिळवला.
सरबज्योतने गुरुवारी अर्जुन सिंग चीमा आणि शिवा नरवालसह पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक सुवर्णपदक जिंकले होते. तो शनिवारी दिव्याच्या भागीदारीसह मिश्र सांघिक स्पर्धेत भारताला सातवे सुवर्ण मिळवून देणार होता. परंतु उत्तरार्धात काही खराब शॉट्स या जोडीने मारल्याने त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.