Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून चार दिवसांत भारताने 22 पदके जिंकली आहेत. पाचव्या दिवशीही अनेक खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा आहे.
चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज(दि.28) 5वा दिवस आहे.भारताला पाचव्या दिवशी वुशूमध्ये पहिले पदक तर नेमबाजीत दुसरे पदक मिळाले.यासह भारताने आतापर्यंत 24 पदके जिंकली आहेत.
गुरुवारी,आज पाचव्या दिवशी भारतीय पुरुष संघाने 10 मीटर एअर पिस्तुलमध्ये दिवसातील पहिले सुवर्ण जिंकले. सरबजीत सिंग, अर्जुन सिंग आणि शिवा नरवाल यांच्या संघाने पुरूषाच्या 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक नेमबाजी स्पर्धेत चीनचा एका गुणाने पराभव केला आहे. भारताने 1734 गुणांसह सुवर्णपदक तर चीनने 1733 गुुुुुुणांसह रौप्यपदक आणि व्हिएतनामने 1730 गुणांसह कांस्यपदक जिंकलं आहे.
दरम्यान,भारताला पाचव्या दिवशी वुशूमध्ये पहिले पदक मिळाले.भारतीय वुशू खेळाडू रोशिबिना देवीने महिलांच्या 60 किलो वजनी गटात दिवसाचे पहिले पदक जिंकले. अंतिम फेरीत तिला चीनच्या जिओवेई वू हिच्याकडून 2-0 असा पराभव पत्करावा लागला.त्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.2018 मध्ये तिनं कांस्यपदक जिंकले होते.आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील वुशूमधील भारताचे हे दुसरे रौप्य पदक आहे.