Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून चार दिवसांत भारताने 22 पदके जिंकली आहेत. पाचव्या दिवशीही अनेक खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा आहे.
चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज(दि.28) 5वा दिवस आहे.भारताला पाचव्या दिवशी वुशूमध्ये पहिले पदक मिळाले.यासह भारताने आतापर्यंत 23 पदके जिंकली आहेत.
गुरुवारी,आजभारताला पाचव्या दिवशी वुशूमध्ये पहिले पदक मिळाले.भारतीय वुशू खेळाडू रोशिबिना देवीने महिलांच्या 60 किलो वजनी गटात दिवसाचे पहिले पदक जिंकले. अंतिम फेरीत तिला चीनच्या जिओवेई वू हिच्याकडून 2-0 असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.2018 मध्ये तिनं कांस्यपदक जिंकले होते.आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील वुशूमधील भारताचे हे दुसरे रौप्य पदक आहे.