हांगझोऊ :- 19व्या आशियाई खेळांमध्ये (Asian Games 2023), 5 ऑक्टोबर रोजी कबड्डी स्पर्धेच्या चौथ्या दिवशी एकूण 4 सामने खेळले गेले. हे सर्व सामने पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेत झाले. भारतीय पुरुष संघाने आज दोन सामने खेळले आणि दोन्ही जिंकले आणि गटात पहिले स्थान कायम राखले. महिला संघाप्रमाणेच पुरुष संघानेही उपांत्य फेरी गाठून पदक निश्चित केले आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीत पुरुष गटात परंपरागत प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांच्यात उपांत्य सामना होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने तैवानचा 50-27 असा पराभव केला. पहिल्याच हाफमध्ये भारताने 24 गुणांची आघाडी घेतली होती. नितीन रावल, नितेश कुमार यांनी भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर दुसऱ्या सामन्यात भारताने जपानचा 56-30 असा एकतर्फी पराभव केला.
Team 🇮🇳 produces a double dhamaka on Day 4️⃣ 💥
Presenting today’s results of the kabaddi event at #AsianGames2022 ✔
For all the updates ➡️ https://t.co/cfORnVakqn and the Official Pro Kabaddi App 📲#RaidForGlory #Kabaddi #Hangzhou #AsianGames pic.twitter.com/ld7OPfRSSS
— ProKabaddi (@ProKabaddi) October 5, 2023
कबड्डीत उद्या(शुक्रवार,दि.6) पुरुष आणि महिला या दोन्ही स्पर्धांच्या उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. पुरुषांच्या उपांत्य फेरीत भारताचा मुकाबला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल आणि हा एक महामुकाबला असेल, तर अन्य उपांत्य फेरीत इराणचा सामना चिनी तैपेईशी होईल. महिलांच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना नेपाळशी तर इराणचा सामना चायनीज तैपेईशी होणार आहे.
Raid for the 🥇🥈🥉 begins tomorrow 😍
Here are the semi-final fixtures of the kabaddi event at #AsianGames2022 👆
Match updates ➡️ https://t.co/cfORnVakqn & the Official Pro Kabaddi App 💻📱#RaidForGlory #Kabaddi #Hangzhou #AsianGames pic.twitter.com/BqxSfIMWHq
— ProKabaddi (@ProKabaddi) October 5, 2023
पुरुष कबड्डीच्या गटात सर्वात धक्कादायक कामगिरी दक्षिण कोरियाच्या संघाची होती, त्यांनी त्यांच्या 3 सामन्यापैकी एकही सामना जिंकला नाही. दुसरीकडे पाकिस्तानने सर्वांना चकित करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.