हांगझोऊ : – राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीत गतवैभव प्राप्त करण्यासाठी भारतीय पुरूष हॉकी संघाचा प्रवास अगदी योग्य दिशेने सुरु असल्याचे शुक्रवारी सिद्ध झाले. भारताच्या पुरुष हॉकी संघाने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानचा 5-1 असा धुव्वा उडवला व सुवर्णपदकाला थाटात गवसणी घातली.
या स्पर्धेत पहिल्या क्वार्टरपासूनच भारतीय संघाचे वर्चस्व राहीले. जपानने अनेकदा भारताचा बचाव भेदण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. तर दुसरीकडे भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंगसह अन्य खेळाडूंनी जपानच्या प्रत्येक चालीचा त्याच आवेशात उत्तर दिले. गेल्या स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले होते. यावेळी संघाने अफलातून खेळ करत पदकाचा रंगही बदलला. या स्पर्धेच्या इतिहासातील भारतीय पुरुष संघाचे हे चौथे सुवर्णपदक ठरले.
Golden Victory Alert: #HockeyHigh portrayed right by our #MenInBlue 🏒
Team 🇮🇳 outshines 🇯🇵 5⃣-1⃣ and brings home🥇& also a #ParisOlympics Quota 🥳
What a match!!
Great work guys💯 Keep shining 💪🏻#Cheer4India#HallaBol#JeetegaBharat#BharatAtAG22 🇮🇳 pic.twitter.com/UKCKom45tP
— SAI Media (@Media_SAI) October 6, 2023
2014 साली इंचॉनला झालेल्या स्पर्धेत पहिल्यांदा संघाने सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यापूर्वी भारतीय संघाने 1966 व 1998 साली सुवर्णपदक मिळवले होते. शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने 32 व 59 व्या निटाला गोल केले. अमित रोहिदासने 36 व्या मिनिटाला गोल केला. मनप्रीत सिंगने 25 व्या तर अभिषेकने 48 व्या मिनिटाला गोल केले होते. जपानकडून सेरेन तनाकाने एकमेव गोल केला.
INDIAAAAAA!
We are the Champions of Asia 🇮🇳🥇All the best to Japan 🇯🇵 hopefully we meet again in Paris 🇨🇵
📍Hangzhou, China.
📺 Streaming on Sony LIV and Sony Sports Network.#HockeyIndia #IndiaKaGame #AsianGames #TeamIndia #HangzhouAsianGames #EnRouteToParis #IndianTeam… pic.twitter.com/rkgThsvs2j— Hockey India (@TheHockeyIndia) October 6, 2023
पेनल्टी कॉर्नरचा पुरेपुर उपयोग
हा सामना भारतीय संघासाठी एका वेगळ्याच कारणाने महत्वाचा ठरला. यापूर्वी सातत्याने भारतीय संघाला पेनल्टी कॉर्नरचा उपयोग करुन घेता येत नव्हता. या सामन्यात मात्र, भारतीय संघाने एका पेनल्टी कॉर्नरचा अपवाद वगळता मिळालेल्या सर्व पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर गोलमध्ये केले.
पॅरिसचे तिकीटही मिळाले
जपानविरुद्धच्या सामन्यातील विजय भारतीय संघासाठी दुहेरी यश देणारा ठरला. एकतर या विजयाने भारताने सुवर्णअध्याय लिहीला तर पुढील वर्षी पॅरिसला होत असलेल्या ऑलिम्पिकची पात्रताही मिळवली. एकूणच या स्पर्धेत भारताने जो गोलांचा धडाका लावला होता तो या सामन्यातही कायम राहिला.