हांगझोऊ :- शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत अफगाणिस्तानने बलाढ्य पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला व स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत भारतीय पुरुष क्रिकेट संघाने येथे स्पर्धेत बांगलादेशचा 9 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे अंतिम फेरीत आता उद्या (शनिवार, सकाळी 11.30 वाजता) अफगाणिस्तानचा सामना भारतीय संघाशी होणार आहे.
पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानला 18 षटकात सर्वबाद केवळ 115 धावाच करता आल्या. पाकिस्तानकडून ओमर युसुफने सर्वाधिक 24 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून फरीद अहमदने सर्वाधिक 3 बळी घेतले.
🚨 𝐀𝐅𝐆𝐇𝐀𝐍𝐈𝐒𝐓𝐀𝐍 𝐎𝐍𝐓𝐎 𝐓𝐇𝐄 𝐅𝐈𝐍𝐀𝐋𝐒 👏#AfghanAbdalyan, banking on an incredible all-round display, managed to beat @TheRealPCB by 4 wickets and qualify for the Grand Finale of the #AsianGames Men’s Cricket Competitions. 🤩👏
Congratulations! #AFGvPAK pic.twitter.com/dhArdcZZFR
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) October 6, 2023
प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने 17.5 षटकांतच 6 गडी गमावून 116 धावा करत विजयासह अंतिम फेरी गाठली. त्यांच्याकडून नुर अली झद्रानने 39 तर, गुलबदन नईबने नाबाद 26 धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून अराफत मिन्हास व उस्मान कादीर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.