Asian Games 2023: आशियाई खेळांमध्ये (Asian Games) भारताच्या सुवर्णपदकाची घोडदौड सुरूच आहे. आज दिवसाची सुरुवातच सुवर्णमयरीतीने झाली आहे. आज तिरंदाजीमध्ये ओजस देवतळे आणि ज्योती वेण्णम यांनी कंपाऊंड मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. या जोडीने दक्षिण कोरियाच्या संघाचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले.
भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नम आणि ओजस प्रवीण देवताळे या जोडीने दक्षिण कोरियाच्या सो चेचान आणि जू जेहून या जोडीचा अंतिम फेरीत १५९-१५८ अशा फरकाने पराभव केला. यामुळे आशियाई खेळांमध्ये (Asian Games)भारताच्या नावावर हे १६वं सुवर्णपदक नोंदवलं गेलं आहे. तसेच भारताने आशियाई खेळांमध्ये (Asian Games)आजवर जिंकलेल्या सुवर्णपदकांशी बरोबरी केली आहे. यापूर्वी जकार्तामध्ये झालेल्या आशियाई खेळात (Asian Games)भारतानं ही कामगिरी केली होती.
🥇🏹 𝗔 𝗚𝗢𝗟𝗗 𝗪𝗜𝗡 𝗜𝗡 𝗔𝗥𝗖𝗛𝗘𝗥𝗬! 🏹🥇#KheloIndiaAthletes Ojas and @VJSurekha have hit the bullseye and clinched India’s FIRST GOLD in archery, defeating Korea by a scoreline of 159 – 158! 🇮🇳🌟
Their impeccable skill and teamwork have earned them the ultimate… pic.twitter.com/eMmhxU6W7b
— SAI Media (@Media_SAI) October 4, 2023
दरम्यान, भारताला मंजू राणी आणि राम बाबू या जोडीने बुधवारी पहिले पदक मिळवून दिले. या भारतीय जोडीने 35 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत देशासाठी कांस्यपदक जिंकले. यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे 70 वे पदक होते.
INDIA HAS CREATED HISTORY….!!! 🇮🇳
71st medal in Asian Games, their best performance over, going past 70 medals in 2018.
– A great day in Indian sporting history. pic.twitter.com/D5AS2SA1aG
— Johns. (@CricCrazyJohns) October 4, 2023
2023 आशियाई खेळांच्या 11 व्या दिवसापर्यंत भारताच्या नावावर 16 सुवर्ण, 26 रौप्य आणि 29 कांस्य पदके आहेत. या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games) पदकांचे शतक झळकावून भारत इतिहास रचू शकतो. आज म्हणजेच बुधवारी भारत 10 हून अधिक पदके जिंकेल अशी अपेक्षा आहे.