Entertainment – बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने नुकताच ‘टायगर 3’ चित्रपटातून चाहत्यांमध्ये ‘टायगरचा मेसेज’ रिलीज केला. अविनाश सिंग राठोडच्या भूमिकेत सलमान खानला पुन्हा एकदा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे. 2023 चा हा बहुप्रतिक्षित चित्रपट चित्रपटगृहात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे . चाहत्यांचा उत्साह वाढवण्यासाठी निर्मात्यांनी आता आणखी एक मोठे सरप्राईज देण्याचा निर्णय घेतला आहे.
‘टायगर 3’ हा YRF Spy Universe अंतर्गत बनलेला पहिला चित्रपट आहे. त्यानंतर ‘वार’ आणि ‘पठाण’ लोकांना खूप आवडला. आता समोर आलेल्या वृत्तानुसार, निर्माते ‘वॉर 2’ मधून ज्युनियर एनटीआरचे पात्र देखील सादर करतील. तसेच ज्युनियर एनटीआर सलमान खानच्या ‘टायगर-३’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे, मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आदित्य चोप्रा सलमान खानच्या ‘टायगर 3’ चित्रपटात ‘वॉर 2’ मधील ज्युनियर एनटीआरची व्यक्तिरेखा सादर करण्याचा विचार करत आहे. ज्युनियर एनटीआर ‘वॉर 2’ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘वॉर 2’ सध्या निर्मितीच्या टप्प्यात आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआरसोबत हृतिक रोशन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सलमान खानचा ‘टायगर 3’ यावर्षी दिवाळीच्या खास मुहूर्तावर पडद्यावर येणार आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे
‘वॉर 2’ मध्ये हृतिक, ज्युनियर एनटीआर आणि कियारा अडवाणी आहेत. ‘टायगर 3’मध्ये सलमान, कतरिना आणि इमरान हाश्मी दिसणार आहे. हे दोघेही गुप्तचर विश्वाचा भाग आहे. ‘टायगर 3’ नंतर या विश्वातून ‘वॉर 2’ येणार आहे. ‘टायगर विरुद्ध पठाण’ पुन्हा येणार आहे.