Asia Cup 2023 Super4 Sri lanka vs Bangladesh :- आशिया कपमधील सुपर फोरमधील दुसरा सामना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात होत आहे. बांगलादेशचा संघ सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत झाला असून अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी या संघाला विजय मिळवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर गतविजेत्या श्रीलंकेलाही विजयासह अंतिम फेरीतील आपला दावा मजबूत करायचा आहे.
बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.बांगलादेशचा संघ एका बदलासह मैदानात उतरला आहे. अफिफ हुसैनच्या जागी नसूम अहमदला संधी देण्यात आली आहे. श्रीलंकेच्या संघात कोणताही बदल झालेला नाहीी.
दोन्ही संघाचे Playing 11 पुढीलप्रमाणे :-
बांगलादेश :- मोहम्मद नईम, मेहदी हसन मिराज, लिटन दास, शकीब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), शमीम हुसेन, तस्किन अहमद, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद, नसुम अहमद.
श्रीलंका :- पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेलालागे, महिश तिक्षाना कसुन राजिथा, मथिशा पाथिराना.