#AsiaCup2023 Super-4 #INDvPAK : मुसळधार पावसामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना थांबवावा लागला आहे. सामना थांबला तेेेेेव्हा टीम इंडियाने 24.1 षटकात 2 गडी गमावून 147 धावा केल्या होत्या. सध्या केएल राहुल 28 चेंडूत 17 धावा आणि विराट कोहली 16 चेंडूत 8 धावा करत फलंदाजी करत आहे. तिसर्या विकेटसाठी दोघांमध्ये आतापर्यंत 38 चेंडूत 24 धावांची भागीदारी झाली आहे.
या सामन्यासाठी उद्याचा दिवस राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे.आज जर पावसामुळे सामना सुरू झाला नाही, तर भारतीय संघ उद्या 24.1 षटकांपासूनच फलंदाजीला सुरुवात करेल.
दरम्यान, यापूर्वी प्रेमदासा स्टेडियममध्ये रोहित शर्मा आणि शुभमन गिलचे तुफान पाहायला मिळाले. शुबमनने शाहीनच्या दोन षटकांत प्रत्येकी तीन चौकार मारले होते. त्याचवेळी पाकिस्तानी गोलंदाजांची लय बिघडली. रोहित आणि शुभमन यांनी पहिल्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी शादाब खानने मोडली.त्याने कर्णधार रोहितला बाद केले.
हिटमॅनने आपले 50 वे अर्धशतक झळकावले. त्याने 49 चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 56 धावांची खेळी केली. त्याचवेळी शुभमनने एकदिवसीय कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकावले. शाहीन आफ्रिदीने त्याला सलमानकडे झेलबाद केले. शुभमन गिल 52 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 58 धावा करून बाद झाला.