कोलकाता – भारतीय फुटबॉल संघाने येथे सुरु असलेल्या आशिया करंडक पात्रता फुटबॉल स्पर्धेत अफगाणिस्तानचा 2-1 असा पराभव केला. या विजयाच्या जोरावर भारताने या स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवताना सहा गुणांसह क्रमवारीत ड गटात दुसरे स्थान मिळवले आहे.
या सामन्यात पहिला हाफ गोलशुन्य बरोबरीत संपला. दुसरा हाफ सुरु जाल्यावरही दोन्ही संघांनी आपला बचाव भक्कम करताना एकही गोल होऊ दिला नाही. मात्र, भारताचा अनुभवी खेळाडू व कर्णधार सुनील छेत्रीने 86 व्या मिनिटाला अघमाशित्नाचा बचाव भेदला व पहिला गोल केले.
त्यानंतर दोनच मिनिटांत अफगाणिस्तानच्या झुबेर अमिरीने भारताचा बचाव भेदत गोल केला व संघाला 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली. दुसरा हाफ संपत असताना अतिरीक्त वेळेत भारताच्या सहाल अब्दुल समाद याने गोल केला व भारताचा विजय साकार केला.