पुणे –सिंहगड रस्ता ज्येष्ठ नागरिक कॅरम क्लबने स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केलेल्या कॅरम स्पर्धेत अशोक केदारी यांनी विजेतेपद मिळवले. केदारी यांनी अंतिम लढतीत राम जगताप यांचा 25-23, 25-24 असा पराभव केला.
केदारी यांचा एकमेव ब्रेक टू फिनिश झाला, अशी माहिती क्लबच्या आर. पी. जोशी यांनी दिली आहे. या स्पर्धेत शंभरपेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला होता. उपांत्य फेरीत केदारी यांनी शाम पासलकर यांच्यावर 25-22, 25-20 असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात शाम पासलकर यांनी विठ्ठल यादव यांच्यावर 25-23, 25-24 अशी मात केली.
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रकाश देशपांडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. करोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करून ही स्पर्धा खेळवली गेली.