पुणे – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सिंहगड रस्ता परिसर ज्येष्ठ नागरिक कॅरम क्लबने कॅरम स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत अशोक केदारी यांनी कासम शेख यांचा 25-24, 25-22 असा तब्बल तीन तास चाललेल्या अतीतटीच्या लढतीत पराभव केला व विजेतेपद मिळवले.
या स्पर्धेत जवळपास दिडशे स्पर्धक सहभागी झाले होते. उपांत्य फेरीच्या लढतीत केदारी यांनी राजा निंबाळकर यांचा 25-20, 25-14 असा पराभव केला होता. तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात राजा निंबाळकर यांनी दिलीप रानडे यांच्यावर 25-15, 25-10 अशी मात केली.
या स्पर्धेत एकमेव ब्रेक टू फिनिश केदारी यांनीच केले. तर ब्लॅक टू फिनिश कासम शेख यांनी केला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रख्यात बांधकाम व्यावसायिक राम जोग यांच्या हस्ते करण्यात आले.