आशा वर्कर्स युनियनंच निवेदन

कोल्हापूर- केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य योजनांची जनतेमध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करणार्‍या कोल्हापूर शहरातील आशा महिलांना सर्व प्रकारचे दाखले त्वरीत उपलब्ध करून दयावेत, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स युनियनं आज केली. या मागणीचं निवेदन महापालिका उपायुक्त मंगेश शिंदे आणि आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पाटील यांना देण्यात आलं.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेचं अन्य आरोग्य योजना जनतेमध्ये पोहचवण्याची जबाबदारी आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिलांकडं देण्यात आली आहे. ग्रामीण भागात या महिलांचं काम प्रभावीपणे होत असल्या तरी महापालिका क्षेत्रात त्यांच्या कामगिरीला मर्यादा पडत आहेत. याविषयी आज संघटनेच्या जिल्हाध्यक्षा नेत्रदिपा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं उपायुक्त मंगेश शिंदे आणि आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पाटील यांच्याशी चर्चा केली. या अधिकार्‍यांनी शिष्टमंडळाच्या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. शिष्टमंडळात सारिका जाधव, ज्योती तावरे, सुप्रिया कांबळे, गिता कांबळे, दिपाली माने, उमा भोसले, सविता लोखंडे, उषा गणेशाचार्य, पुनम कुंभार यांचा समावेश होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here