पीएनबी कर्मचारी करणार संप

पुणे: पंजाब नॅशनल बॅंकेच्या त्रासदायक योजनेच्या विरोधात देशभरातील अधिकारी व कर्मचारी 24 व 25 जून रोजी संप करणार आहेत. अशी माहिती ऑल इंडिया पंजाब नॅशनल बॅंक ऑफिसर असोसिएशनचे कोषाध्यक्ष कॉ विलियम तुस्कानो यांनी दिली.

यावेळी महाराष्ट्र व गोवा राज्याचे एजीएस कॉ. सूर्यकांत लोंढे व ऑल इंडिया पीएनबी एम्प्लॉई असोसिएशनचे जी. एस. प्रभू व पंजाब नॅशनल बॅंक एम्प्लॉई फेडरेशनचे सचिव प्रभाकर शेट्टी उपस्थित होते. त्यांनी सांगितले की 24 आणि 25 जून 2019 रोजी पीएनबीच्या सर्व शाखा आणि सर्व प्रकारच्या कार्यालयांमध्ये संपूर्ण स्ट्राइक होईल. या दोन दिवसात अधिकारी आणि बॅंक कर्मचारी पूर्णपणे काम बंद करतील. सध्या बॅंक ऑफिसर्स आणि कर्मचारी काळ्या फिती लावून का करत आहेत आणि जवळजवळ प्रत्येक दिवशी त्यांचे व्यवस्थापनास नाराजीचा संदेश पाठवत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.