नवी दिल्ली: जगात तीनपैकी एका महिलेवर शारीरिक किंवा लैंगिक अत्याचार होतो अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. जगात हे प्रमाण 35 टक्के इतके आहे. जगात 38 टक्के महिलांचे खून हे त्यांच्या पतीकडून करण्यात आले आहेत असेही संघटनेने म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आशिया विभागात महिला हिंसाचाराचे प्रमाण भारतातही आहे.
भारतामध्ये 37.7 टक्के महिलांवर हिंसाचार झाला असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ज्या देशांतील लोकांचे वेतन अधिक आहे अशा जगात महिला हिंसाचाराचे प्रमाण 24 टक्के आहे. तर प्रशांत महासागरालगतच्या भागातील देशांत हेच प्रमाण 37 टक्के इतके आहे. महिलांविरोधात हिंसाचार हा महिलांच्या पतीकडून होत असतो तसेच यात मोठ्या प्रमाणात महिलांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होते, असेही संघटनेने म्हटले आहे. हा हिंसाचार संपवण्यासाठी आरोग्य संघटनेने उपाययोजना केल्या आहेत, त्यासाठी देशांच्या सरकारकडे त्यांनी अहवालही सुपूर्द केले आहेत.