पुणे – सण, उत्सव, व्रत, उपवास असलेला श्रावण सुरू झाला आहे. त्यामुळे साबुदाणा आणि शेंगदाण्याला मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने घाऊक बाजारात साबुदाण्याच्या भावात 15 दिवसांत किलोमागे 5 रुपयांनी घसरण झाली आहे. तर, शेंगदाण्याच्या भावात 5 रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी अशोक लोढा यांनी दिली.
लोढा म्हणाले, आता मार्केट यार्डातील भुसार विभागात दररोज 150 ते 200 टन साबुदाणा दाखल होत आहे. श्रावणामुळे मागणीत नेहमीच्या तुलनेत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नवरात्रापर्यंत साबुदाण्याला मागणी राहणार आहे. त्यामुळे भावात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिटेल क्षेत्रातील ग्राहकांनी त्यांना हवा तेवढाच माल खरेदी करावा. घाऊक बाजारात 1 नंबर साबुदाणाला किलोस 78 रुपये, दोन नंबर साबुदाणाला 75 रुपये, तीन आणि चार क्रमांक साबुदाण्याला अनुक्रमे 70 आणि 68 रुपये भाव मिळत आहे. शेंगदाण्याची मध्य प्रदेश, गुजरातमधून आवक शेंगदाण्याविषयी लोढा म्हणाले, शेंगदाण्यालाही मागणी वाढली आहे. सध्या खराब माल जास्त येत आहे.