मुंबई – अभिनेत्री काजोल देवगण जेवढी आपल्या अभिनयासाठी ओळखली जाते तेवढीच आपल्या स्पष्ट स्वभावासाठी देखील परिचित आहे. चित्रपट असो वा एखादी जाहिरात काजोल नेहमीच आपला बेस्ट परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करते. काजोल सध्या मोठ्या पडद्यापासून काहीशी दूर आहे. नुकताच तिचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
काजोलचा व्हायरल होणारा व्हिडीओ एखाद्या चित्रपटातील नसून थेट रस्त्यावरचा आहे. तर झालं असं की काजोल मुंबईतल्या वांद्रे या ठिकाणी काही कामानींमित्त आली होती. काम संपल्यानंतर काजोल आपल्या गाडीच्या दिशेने जात असताना फुटपाथवरील छोट्या गरीब मुलांनी तिला घेरले आणि पैसे मागू लागले.इतक्यात काजोल गाडीमध्ये बसली परंतु लहान मूल दरवाजा वाजवून तिला पैसे मागू लागले. अशात तिने दरवाजा उघडून एका छोट्या मुलाला पैसे देखील दिले. त्यानंतर आणखी एक मुलगा दरवाजा वाजवतो परंतु काजोल त्याला पैसे देत नाही. काजोलचा हाच व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
View this post on Instagram
काजोलने मुलाला पैसे देत त्याची मदत केल्याने अनेकांनी तिचे कौतुकही केले आहे.तर काहींनी तिला ट्रोलही केलं आहे. ‘दिलवाले’ या चित्रपटात शाहरुख सोबत दिसल्यानंतर काजोल पुन्हा एकदा शाहरुखसोबत एका प्रोजेक्टमध्ये झळकणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तर ‘सलाम वेंकी’ या चित्रपटातून काजोल लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.