मुंबई – किंग शाहरुख खान स्टारर मल्टीस्टारर चित्रपट ‘जवान’चे कास्टिंग बॉलिवूडचे प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी केले आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, जेव्हा मुकेशला विचारण्यात आले की शाहरुखने जवानच्या कास्टिंगवेळी कोणते इनपुट दिले? तर तो म्हणाला की शाहरुख कधीच दिग्दर्शकाच्या व्हिजनमध्ये ढवळाढवळ करत नाही. शाहरुख आणि काजोलचा सुपरहिट चित्रपट डीडीएलजेच्या रिमेकसाठी त्यांची मुलं आर्यन आणि न्यासा हे परफेक्ट कास्टिंग आहेत.
मुकेश म्हणाले, ‘शाहरुख या चित्रपटाचा निर्माता असूनही त्याने कास्टिंगमध्ये कधीही हस्तक्षेप केला नाही. शाहरुख दिग्दर्शकाच्या व्हिजनमध्ये कधीही ढवळाढवळ करत नाही. तो दिग्दर्शकाला स्वतःचे निर्णय घेऊ देतो. त्याच्यासोबत काम करणाऱ्या दिग्दर्शकाला तो राजासारखा भासवतो.’
जेव्हा मुकेशला ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (DDLJ) च्या रिमेकसाठी कोणाला कास्ट करायला आवडेल असे विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, ‘आर्यन खूप मोहक आहे. तो एक अप्रतिम अभिनेता देखील आहे. रिमेकमध्ये शाहरुखची जागा घेऊ शकतो. त्याचबरोबर काजोलची भूमिका तिची मुलगी नीसा देवगण साकारू शकते. ती खूप सुंदर आहे आणि अभिनयासाठी तयार होत आहे.’
दरम्यान, जवान हा चित्रपट ७ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात शाहरुख खानने पहिल्यांदाच साऊथ डायरेक्टर एटलीसोबत काम केले आहे. शाहरुख व्यतिरिक्त यात नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियामणी आणि संजय दत्त यांच्यासह अनेक मोठे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटात शाहरुख खान पुन्हा एकदा दुहेरी भूमिकेत आणि करिअरमध्ये पहिल्यांदाच टक्कल पडलेल्या लूकमध्ये दिसणार आहे.