मुंबई – टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक अलीकडे तिच्या प्रेग्नेंसीच्या अफवांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी रुबिनाने रंगीत फ्लोरल स्प्लिट ड्रेस घातलेले तिचे काही फोटो पोस्ट केले होते. फोटोमध्ये रुबिना सुंदर दिसत होती. मात्र अनेक चाहत्यांनी या फोटोवरून अंदाज लावला की, लवकरच यांच्या घरी चिमुकल्याचे आगमन होणार आहे. मागील काही दिवसांपासून रुबिनाच्या गरोदर पणाच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहे. यावर स्वत: रुबिनाने प्रतिक्रिया दिली आहे.
एका मुलाखतीदरम्यान रुबिनाला तिच्या प्रेग्नेंसीबद्दलच्या अफवांवर विचारण्यात आले. तेव्हा ती म्हणाली की, “मला माहित आहे की मी यात फार काही करू शकत नाही, त्यामुळे मी या गोष्टींचा त्रास घेत नाही. या अफवा होतच राहतात आणि मी याबद्दल फार काही करू शकत नाही.” तर पंजाबी इंडस्ट्रीत पदार्पण करणारी रुबीना पुढे म्हणाली की, “माझ्यावर कोणत्याही अफवेचा परिणाम होत नाही, मग ते काम असो किंवा माझे वैयक्तिक आयुष्य. आम्ही आमचे जीवन सार्वजनिक व्यक्तिमत्त्व म्हणून लोकांसमोर आणले आहे, त्यामुळे ते अगदी चांगले आहे. मी माझे काम करते आणि लोकांना अंदाज लावू देते.”
दरम्यान, काही दिवसांपूर्वी रुबिनाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये बेबी बंप दिसत असल्याचे चाहत्यांच्या लक्षात आल्यावर ही चर्चा सुरू झाली. रुबिनाचा पती अभिनव शुक्लानेही तिच्या गरोदरपणाच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली होती.
“या फक्त अफवा आहेत. मी त्यावेळी प्रवास करत होतो, त्यामुळे त्याबद्दल फार काही वाचलं नाही. मला माहित नाही काय झाले आणि लोक त्याबद्दल का बोलू लागले. त्याने एक फोटो टाकला आणि लोकांनी त्यावर कमेंट्स केल्या. मला याबाबत काहीही म्हणायचे नाही. लोकांना चर्चा करू द्या,” असे अभिनव म्हणाला होता. त्यानंतर रुबिनाने देखील या अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.