मुंबई – बॉलीवूड किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचा हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीत समावेश असल्याचीही मोठी माहिती समोर आली आहे. कॉर्डेलिया या २ हजार प्रवासी क्षमतेच्या आलीशान क्रूझवर ड्रग्ज पार्टीचं आयोजन करण्यात आलं होत.
Eight persons — Aryaan Khan, Arbaaz Merchant, Munmun Dhamecha, Nupur Sarika, Ismeet Singh, Mohak Jaswal, Vikrant Chhoker, Gomit Chopra — are being questioned in connection with the raid at an alleged rave party at a cruise off Mumbai coast: NCB Mumbai Director Sameer Wankhede pic.twitter.com/KauOH2ULts
— ANI (@ANI) October 3, 2021
या क्रूझवर सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमलीपदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) शनिवारी रात्री छापा टाकला. यावेळी आर्यन खानसह १० हून अधिक मोठ्या व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं आहे.
ताब्यात घेतलेल्या १० हून अधिक मोठ्या व्यक्तींमध्ये आर्यन खानसह अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे.
आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीवेळी ड्रग्ज पार्टीबाबत त्याने चूक केल्याची कबुलीही दिली आहे. आर्यनने सांगितले आहे की, क्रूझवरील पार्टीमध्ये पाहुणा म्हणून बोलावण्यात आलं होतं. पार्टीत जाण्यासाठी मला कोणतेही पैसे भरावे लागले नव्हते. चौकशीदरम्यान आर्यन खानने कार्यक्रमाच्या आयोजकांना आपल्या नावाचा वापर करत इतरांना आमंत्रण दिलं असा दावा केला आहे.’
दरम्यान, एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यन खानचा मोबाइल फोन जप्त केला असून त्यामधील चॅट्स आणि टेक्स्ट मेसेजेची तपासणी केली जात आहे. याशिवाय ताब्यात घेतलेल्या इतरांचेही मोबाइल तपासले जात आहेत.