सलग तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत सहा मंत्र्यांनी देखील शपथ घेतली . या सहा मंत्र्यांमध्ये मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, इमरान हुसेन आणि राजेंद्र गौतम यांचा समावेश आहे.
अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील शपथविधी सोहळ्याला आमंत्रित केलं आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला येणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आम आदमी पक्षाच्या वतीने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रणाचं पत्र पाठवलं होत. नियोजित कार्यक्रमानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी वाराणसी येथे असणार आहेत. ‘आप’च्या गोपाल राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील सर्व सात खासदारांना आणि भाजपच्या आठ नवनिर्वाचित आमदारांना या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे.
इतर कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री किंवा नेत्यांना या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण दिले नव्हते] कारण हा सोहळा दिल्लीसाठी होता . अरविंद केजरीवाल यांनी वृत्तपत्रांमध्ये जाहिरातींद्वारे दिल्लीकरांना शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहण्याचं आवाहन केलं होतं .