सत्यजित मंडले यांना लोकमान्य टिळक पारितोषिक व सुवर्णपदक

पुणे – सत्यजित मंडले यांनी मास्टर ऑफ जर्नलिझम परीक्षेत टिळक महाराष्ट्र विद्यापीठात प्रथम येत सुवर्णपदक व लोकमान्य टिळक पारितोषिक प्राप्त केले आहे. मास्टर ऑफ जर्नलिझम ही त्यांची सातवी डिग्री आहे.

या आधी त्यांनी एम. ए. क्‍निनिकल सायकोलॉजी विशेष प्रावीण्यासह पूर्ण केली आहे. शनिवारी त्यांना टिमवि येथे सुवर्णपदकाने गौरवण्यात आले आहे. एफटीआयआय या जगप्रसिद्ध चित्रपट प्रशिक्षण संस्थेतून त्यांची सिनेमाविषयक पदवी घेतली आहे. त्याचप्रमाणे एम.ए.-मास कम्युनिकेशन-मीडिया प्रोडक्‍शन आणि पीजी डिप्लोमा इन इलेक्‍ट्रॉनिक्‍स
मीडिया आणि फिल्म प्रोडक्‍शन विषयात पूर्ण सोबतच पी.जी. डिप्लोमा इन मास मीडियादेखील त्यांनी पूर्ण केले आहे.

माध्यम व सिनेमाविषयक ते अभ्यासक असून अनेक नामवंत संस्थांसोबत त्यांनी काम केले आहे. अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. माध्यम सल्लागार म्हणून अनेक वेब पोर्टलचे ते मार्गदर्शकदेखील आहेत. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.