Arvind Kejriwal on Kumar Saxena – दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना ( Kumar Saxena ) मला रोज जेवढे रागवतात तेवढे तर माझी पत्नीही मला रागवत नाही अशी मिश्किल टिप्पणी करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांनी नायब राज्यपालांना लक्ष्य केले आहे.
राज्यपालांनी दिल्ली सरकारच्या मद्दय धोरणापासून ते शिक्षण धोरणापर्यंत आणि मोफत विजेच्या धोरणापासून अबकारी नितीपर्यंत सगळ्याच विभागांच्या चौकशीचे आदेश दिले असल्यामुळे आम आदमी पक्ष विरूध्द राज्यपाल असा संघर्ष चिघळला आहे.
Congress । कॉंग्रेस पक्षाच्या ‘या’ मोठ्या नेत्याचे राष्ट्रपतींबद्दल अपशब्द
आपच्या सगळ्यांच प्रमुख नेत्यांनी सोशल मीडियावर सक्सेना यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. त्यामुळे दिल्लीत प्रचंड आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
LG साहिब रोज़ मुझे जितना डाँटते हैं, उतना तो मेरी पत्नी भी मुझे नहीं डाँटतीं।
पिछले छः महीनों में LG साहिब ने मुझे जितने लव लेटर लिखे हैं, उतने पूरी ज़िंदगी में मेरी पत्नी ने मुझे नहीं लिखे।
LG साहिब, थोड़ा chill करो। और अपने सुपर बॉस को भी बोलो, थोड़ा chill करें।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) October 6, 2022
राज्यपालांकडून रोज कोणत्या तरी नव्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्लीच्या मुख्य सचिवांना दिले जात असल्यामुळे केजरीवालही यात केंद्रस्थानी आले आहेत. त्यामुळेच त्यांना राज्यपालांना उद्देशून केलेले ट्वीट आज चर्चेचा विषय ठरले आहे.
Bharat Jodo | भारत जोडोचा कर्नाटकात परिणाम होणार नाही – मुख्यमंत्री बोम्मई
केजरीवाल ( Arvind Kejriwal ) आपल्या ट्वीटमध्ये पुढे म्हणाले की नायब राज्यपाल साहेबांनी गेल्या सहा महिन्यांत मला जेवढी प्रेमपत्रे पाठवली आहेत तेवढी माझ्या पत्नीने मला आतापर्यंत पाठवली नाहीत. राज्यपालांनी थोडे थंड व्हावे आणि त्यांच्या सुपरबॉसलाही थोडे थंड होण्यास सांगावे असे केजरीवाल यांनी सूचवले आहे. ( Arvind Kejriwal on Kumar Saxena )